बप्पा झाले सोन्याचे
ढोल आणि इसपीकरचा होता मोठा आवाज
दुसऱ्या दिवशी डोळ्यांची बारी
हॅलोजनची रोषणाई चेहऱ्यावर भारी
तिसऱ्या दिवशी डोक्याला ताप
किलो भर सोन्याचा मुकुट बनला संताप
चवथ्या दिवशी दातान वर प्रहार
सोन्याचे पत्रे चडवले चमकदार
पाचव्या दिवशी कापड बदलली
सोन्याची उपर्ण आणि धोतर चढवली
साहव्या दिवशी डोक्यावर चांदीचा छत्र आला
सातव्या दिवशी सिंहासन हि सोन्याचा झाला
आठव्या दिवशीतर कमालच झाला
हातातला मोदक ही सोन्याचा झाला
नव्या दिवशी मनात परत जायचा विचार आला
खाली बघितल तर पायतला उंदीर हि सोन्याचा झाला
दहाव्या दिवशी लोकांनी सगळ काडून घेतल
आणि जस मातीच होतो तसच विर्स्रजीत केल
1 comment:
A very true picture of how materialistic we have become that even our gods are worshiped for this reason.
Post a Comment