Pages

Monday, November 4, 2013

बप्पा झाले सोन्याचे


बप्पा  झाले   सोन्याचे

पहिल्या दिवशी झाला कानाला त्रास
ढोल आणि  इसपीकरचा  होता मोठा  आवाज
दुसऱ्या दिवशी  डोळ्यांची बारी 
हॅलोजनची रोषणाई चेहऱ्यावर भारी 
तिसऱ्या दिवशी डोक्याला ताप 
किलो भर सोन्याचा मुकुट बनला संताप 
चवथ्या दिवशी दातान वर प्रहार 
सोन्याचे पत्रे चडवले चमकदार 
पाचव्या दिवशी कापड बदलली 
सोन्याची उपर्ण आणि धोतर चढवली 
साहव्या दिवशी डोक्यावर चांदीचा छत्र आला 
सातव्या दिवशी सिंहासन हि सोन्याचा झाला 
आठव्या दिवशीतर कमालच झाला 
हातातला मोदक ही सोन्याचा झाला 
नव्या दिवशी मनात परत  जायचा  विचार आला
खाली बघितल तर पायतला उंदीर हि सोन्याचा झाला 
दहाव्या दिवशी लोकांनी सगळ काडून घेतल 

आणि जस मातीच होतो तसच विर्स्रजीत केल