Pages

Friday, July 22, 2011

मुंबईकर

मुंबईकर

नवऱ्याला यायला उशीर झाला तर बायकोने विचारले 
का हो का उशीर झाला ?
नवरा म्हणाला काय नायग 
रस्त्यात एक बॉम स्फोट झाला.    

बायको म्हणते बॉम स्फोट !
मी किती घाबरले माला वाटलं
  ऑफिसात नवीन काम आल.
नवरा म्हणतो अम्हाला कसल काम आल 
हां, मात्र, न्यूज  वाले, पोलीस, मंत्री
यांना नवीन काम मिळाल.  
मंत्री न्यूज  चायनेल वर चर्चा करतील 
लोक मेणबत्ती घेऊन मार्च करतील 
घोषणा, वेदना, संवेदनाचे पाऊस पडतील 
आरोप प्रती आरोपचे बान सुटतील. 

थोड्या दिवसाने लोक हे सर्व विसरतील 
आणि परत आपल्या कामाला लागतील .

मुंबईकराला बॉम स्फोटाची  भीती नसते 
त्याला लोकल, नौकरी , घर याची  चिंता असते.
मुंबई कधीच थांबत नाही अस म्हणतात
पण मुंबईच मन कधीच मेल आहे
मुंबईकराच्या हिम्म्तेला लोक सलाम करतात 
जो रोज मरतो त्याला मुंबईकर म्हणतात .