Pages

Monday, February 21, 2011

साहेब आले

साहेब आले असे मला  ऐकू  आले.
पूर्ण रस्ता खाली झाला
सिग्नल  वरचे  ट्राफिक थांबवण्यात  आले 
कारण होते साहेब आले

फुटपाथवर  बसलेले पेपर वाले
रस्त्या वर थांबलेले रिक्षा  वाले
सगळ्यांना  पळवण्यात आले 
कारण होते साहेब आले

वेगाने  १० ते १२ गाड्यांचा  काफिला निघून  गेला
कुणास  ठाऊक कुठल्या  गाडीत होते साहेब
लोकांना समझेनासे झाले आणि   सगळे  आपल्या  कामाला निघाले
हे तेच साहेब जे निवडणुकीपूर्वी  खुल्या गाडीत लोकांच्या मध्ये असायचे 
हात जोडून कधी त्यांच्या दारी  तर कधी त्यांच्या घरी असायचे
तेच आता बंद  गाडीत नाहीसे झाले
आणि  लोकांना फक्त एवढेच  ऐकू  आले
साहेब आले साहेब आले     
  
साहेबांना  अचानक काय  झाले
जे लोक साहेबांना  आपले वाटत होते
ज्यांच्याकडे ते मत मागत  होते
ते अचानक शत्रू  कसे झाले
साहेब आता नाहीसे झाले
लोक आपापल्या  कामाला निघाले
त्यांना फक्त एवढेच  ऐकू  आले
साहेब आले साहेब आले

2 comments:

Unknown said...

Hey! Nice one. Good thought. Issue is small but not negligible yet we neglect. Fact is in the words. Politics put in poem, heard the first time. Keep going.

And you know what, I read the entire poem in Marathi & I COULD UNDERSTAND, wow! na.

karuna said...

A big thought written in simple and sweet words.Good going in Marathi.