Pages

Sunday, November 27, 2011

तो दगडात हि दिसतो

                                                       तो दगडात हि दिसतो


तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
त्याच्या साठी आपण तासन तास रांगेत थांबतो
जनावरा सारखे धक्का बुक्की करत पुडे सरकतो
आणि नंबर आल्या वर डोक टेकवण्या आधीच बाहेर फेकले जातो.

तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
पार्किंग,चपल,हार, देणगी पेटी, हवन,महा पूजा , महा प्रसाद
या सगळयान , साठी आपण मन मोकळेपणाने पैसे देतो
पण मात्र भाजी वाला , रिक्षा वाला , किराणा वाला , दुध वाला
यांना पैसे देताना एक एक रुपया साठी भांडतो

तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
त्याची श्रीमंती  दिवसेंदिवस  वाढत आहे.
आणि आपली गरिबी जवळ  येत  आहे
त्याच्या घरी पैसे मोजण्याची मशीन आहे
आणि आपल्या कडे मोजण्या  इतके पैसे नाही
त्याची रोज दुधाने अंघोळ  असते
कित्तेक  घरी प्यायला  दुध नसते

तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
असे  म्हणतात कि तो चोरांना शिक्षा देतो
चोरांन पासून सावध राहा असा संदेश त्याच्याच  घरी असतो
आपण म्हणतो कि तो आपल्यात आहे
तर तो आपल्याला माणसात का दिसत नाही
तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही





No comments: